Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Summary of the Book
Prevention is better than cure, अर्थात निरोगी आरोग्याची पहिली पायरी. कोणतेही आजारपण येण्याआधीच, किंबहुना आजारी पडूच नये यासाठी अनेक औषध प्रणाली आहेत. १२ क्षार अथवा 12 Tissue remedy ही बायोकेमिक औषधपद्धती डॉ. शुश्लर यांनी जर्मनीत प्रचलित केली. बारा क्षारांचा अंतर्भाव असणा-या औषधांचा उपयोग विशिष्ट क्षारांचा शरीराला सतत पुरवठा करुन तंदुरुस्ती राखणे हा आहे. या पद्धतीला भरणशास्त्र पद्धती असेही म्हणतात. हे क्षार साबुदाण्यासारख्या गोड गोळ्यांच्या रुपात मिळतात. कायम घेत राहिल्यास तब्येत उत्तम राहते. दर १५ दिवसांनी नॉर्मल माणसांनी क्षार घ्यावेत असे डॉ. शुश्लर यांचे म्हणणे आहे.
पुण्यातील कै. सौ. निर्मला रानडे यांनी बाराक्षार पद्धतीचा अभ्यास केला आणि प्रचार व प्रसारही केला. अनेक वर्षे त्या बाराक्षारची औषधे सर्व वयोगटातील लोकांना देत असत. त्यांनी अनेक वर्ग घेतले, दूरदर्शनवर त्यांची मुलाखतही झाली. पुस्तक वाचून सहज समजतील अशा सोप्या भाषेत अनेक आजार व त्यावरील क्षारांची माहिती आणि अनेक मिश्रणे कै. निर्मलाताईंनी त्यांच्या 'सुलभ बाराक्षार' या त्यांच्या पुस्तिकेत दिली आहेत. कै. इंदूताई टिळकांनी केसरीतर्फे समाजसेवा म्हणून १००० पुस्तके १९९० च्या सुमारास छापली. त्यानंतर तीनदा ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
आजच्या महागाईच्या काळात स्वस्त आणि औषधांचे साईड-इफेक्टस् नसणारे किरकोळ आजारांवरही मात करणारे बाराक्षार आपल्या तब्येतीचे नक्कीच संरक्षण करतील. वाढदिवसाप्रमाणे आपला क्षार कोणता आणि तो कसा घ्यावा याबद्दलही पुस्तकात सोप्या भाषेत क्रमवार व संक्षेपाने दिले आहे. ही औषधे होमिओपथीच्या दुकानात उपलब्ध असतात.
सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः। आपल्या सर्वांना निरोगी आयुष्य लाभो.
THIS IS BOOK IS NOT ABLE TO DOWNLOAD FREE E BOOK IN BOOKGANGA E READER APP .
WHILE SEARCHING FOR FREE EBOOK THE APP CLOSES
AND MESSAGE AS THE APP HAS BUG
TRY UPDATING THIS APP AFTER ITS DEVELPOER PROVIDES A FIX FOR THIS ERROR