Summary of the Book
माणसांच्या सुख:दुखातून आपले चैतन्यपूर्ण विश्व आकारास आले आहे. असंख्य व्याख्या करूनही चौकटीला दाद न देणाऱ्या माणसांचे अनोखेपण आपल्या ‘रुतलेली माणसे’ ह्या संग्रहात केशव मेश्राम यांनी अधोरेखीत केले आहे. ही माणसे तशी नात्यातली – लेखकाच्या जिव्हाल्यातली आणि बैठकीतली आहेत. पण त्यामुळेच ती मनात ‘ रुतण्याच्या’ अनेकानेक तऱ्हांचे, त्यांच्या प्रेमलोभांचे, तसेच रागद्वेषांचे, आणि सहज साध्या निष्ठांचेही विलक्षण मनोज्ञ दर्शन ह्या ललितगद्य संग्रहातून होते. संवेदक मन किती प्रमाणात केवढे मनोरेखन करू शकते याचा वस्तुपाठच ‘रुतलेली माणसे’ मधून पाहावयास मिळतो. नवी आवृत्ती ग्रंथाच्या लोकप्रियतेचीच निदर्शक ठरते.