Summary of the Book
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची समृद्ध परंपरा म्हणजे पंढरपूरची वारी. प्रा. नीता अंकुश टेंगले यांनी या वारीचा अभ्यास करून तो विस्तृत स्वरुपात वाचकांसमोर मांडला आहे. 'पंढरपूरच्या वारीची ऐतिहासिक मागोवा,' 'वारीचे धार्मिक व सामाजिक महत्व,'वारीमार्गातील समस्या' अशा चार प्रकरणांमधून त्यांनी वारीची साद्यंत माहिती दिली आहे. वारीचा उगम व विकास, श्री विठ्ठल, ज्ञानेश्वर महाराजांपुर्वीची वारी, तुकाराम महाराजांनंतरची वारी असा इतिहास येतो.
यानंतर प्रत्यक्ष पालखी सोहळा, सोहळ्यात झालेले बदल, रिंगण सोहळा, उडीचा कार्यक्रम, वारकऱ्यांची धाव अशी माहिती समजते. पालखी मार्ग, वाहतूक व्यवस्था, महापूजा, वाद, परदेशी अभ्यासकांनी केलेले संशोधन अशी वेगळी माहितीही समजते. उपसंहारामध्ये आधुनिक वारीचे स्वरूप, वारीला जाणार्यांची बदलेली मानसिकता यावर प्रकाश टाकला आहे.