Summary of the Book
नोकरदार माणूस हा एका चाकोरीतून जात असतो. त्यात तो रोजगारासाठी शहरात आलेला असला तर ऑफिस, सहकारी, साहेब, मित्रमंडळी हेच त्याचे जग बनते. एकमेकांची सुख-दुःखं वाटून घेतली जातात. त्यावर आधारित ‘कबीर खडा बाजार में’ ही कादंबरी दीनानाथ मनोहर यांनी लिहिली आहे. शहरीपणात वेगळे दिसणार्या, माणूसपण जपणार्या व तार्किक विचार करणार्या माणसाची कहाणी यात आहे. सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक लेखन करणार्या दीनानाथ मनोहर यांनी कल्पना व वास्तव याची सांगड घालीत एक वेगळी कथा मांडली आहे.