Summary of the Book
सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी जेवण्याची आवश्यकता असते. आपण जे खातो त्यातले घटक कोणते हे समजले तर त्याचे प्रमाण किती व कसे असावे याचीही माहिती अतिशय उपयुक्त ठरते. इतर घटकांप्रमाणेच ‘व्हिटॅमिन्स’ हाही अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अच्युत गोडबोले व डॉ. वैदेही लिमये यांनी लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक वाचकाला ‘व्हिटॅमिन्स’ची अभ्यासपूर्ण व सर्वांग ओळख करून देणारे आहे; तसेच त्याची आजच्या युगातील उपयुक्तता व त्या संबंधित विवेचन वैद्यकीय व्यावसायीकांसही वाचनीय आहे.