Hard Copy Price:
15% OFF R 400R 340
/ $
4.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
भारत -पाकिस्तान, भारत- चीन, इस्त्रायल- पॅलेस्टाइन असे देशादेशांमधील संघर्ष. साऱ्या जगाला टांगत्या तलवारीसारखा
भेडसावणारा दहशतवाद. पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्या राहणाऱ्या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर
समस्या भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेले गरिबी, कुपोषण, अनारोग्य, बेकारीचे प्रश्न. अशा आव्हानांना सामोरे
जाण्यासाठी भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता दाखवत आहे जागतिक स्तरावर कार्य करणारा एक
विचारवंत जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणाऱ्या संदीप वासलेकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन
खुप छान पुस्तक आहे.. सगळ्यांनी आवर्जून वाचावे. खुप काही शिकायला मिळालं.
Mahendra Kulkarni
30/08/2016
संदीप वासलेकरांनी मांडलेले मुद्दे, दीलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. भारत एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे असं एक चित्र सातत्याने आपल्यासमोर उभं केलं जातं. ऐकायला कितीही गोड वाटलं तरी अर्थिक महासत्त्ता वगैरे बनणं म्हणजे हे पोकळ स्वप्नच आहे ही वस्तुस्थिती वासलेकरांच्या ह्या पुस्तकातुन समोर येते.
सरकार किंवा वित्तीय संस्थांकडुन जी आकडेवारे दिली जाते त्या पेक्षा न दीलेली आकडेवारी बरीच मोठी असते. अर्थिक ताकदीत जरी भारत पहिल्या पाच दहा देशांमधे असला तरी एकुण नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण अशा इतर मह्त्त्वाचे निष्कर्ष लावले तर मात्र आपण पहिल्या शंभरात पण नसु.
नुसती आकडेवारी मांडुन, निष्कर्ष काढुन वासलेकर थांबत नाहीत तर त्यांनी मार्गही सुचवलेत.
अभ्यासण्यासारखं पुस्तक.
Nitin Mali
26/02/2013
auther saying truth about India's future
anjali kelkar
22/10/2012
a must read for everyone who is worried about india's future
ramdasi
19/02/2012
kup chan puskat aahe
तुषार भामरे
26/10/2010
संदीप वासलेकरांच्या ’एका दिशेचा शोध’ या पुस्तकात जागतिक आणि स्थानिक विषयाबाबत आपली नेमकी काय भुमिका आणि वैचारिकता असली पाहिजे यावर पुरकपणे विचारमंथन केले आहे. युवकांना तर या पुस्तकाचा आपली वैचारिक भुमिका ठरवण्यासाठी नक्कीच उत्तम उपयोग होईल. याचा फायदा त्यांना आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातले निर्णय घेताना नक्कीच होईल यात दुमत नाही.
प्रमोद सावंत
18/10/2010
जागतिक घडामोडींचे भारतीय दृष्टीकोनातून
विवेचन करणारे मराठीतील एकमेव पुस्तक. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विश्लेषक संदीप वासलेकर हे देशासमोरील
निव्वळ आव्हाने वा प्रश्न न मांडता त्यावर परिणामकारक उपाय सुचवितात. पर्यावरणाचा मुद्दा, जागतिक तापमानाचे दुष्परिणाम ते मुद्देसूद पटवून देतात. नक्षलवादी, अतिरेकी हे त्या क्षेत्रात कसे जातात त्यामागची पार्शवभूमी त्यांनी निष्पक्षपणे मांडली आहे. आपली शिक्षणप्रणाली आदर्श कशी
करता येईल याचे उत्तम विवेचन म्हणजे
हे पुस्तक. असे हे पुस्तक प्रत्येकाने संग्रही
ठेवावे.