Summary of the Book
साक्षात्कारी संतांच्या मालिकेत तुकाराम महाराजांचे स्थान फार मोठे आहे.त्यांचा अभंगवाणीला वेदवाणीची योग्यता आहे. त्यांची अभंगवाणी ऊर्जस्वल आहे.‘ज्ञानोबा तुकाराम’या भजनाने तुकोबांना ज्ञानदेवांच्या पंक्तीला बसवून महाराष्ट्राने त्यांचे यथार्थ मूलमापन केले आहे.अशा या थोर साक्षात्कारी पुरुषाच्या कल्याणकारी उपदेशाचा परिचय करून देण्याचा नम्र प्रयत्न या ग्रंथात केला आहे.