Summary of the Book
जेव्हा सल्मा लग्नाआधी गरोदर राहते, त्या वेळी लेहांटमधील तिच्या त्या छोट््याशा खेड्यातील तिचं निव्र्याज आयुष्य, कायमचं संपतं. ती किंचाळत असताना तिची नवजात मुलगी तिच्यापासून हिरावून घेतली जाते. घराण्याचा मान आणि इभ्रतीसाठी ठार मारायला निघालेल्या भावाच्या तावडीतून सुटून सल्मा इंग्लंडच्या आश्रयाला येते. इंग्लंडमध्ये एक्स्टर भागात राहताना आपल्या घरमालकिणीकडून ती वागण्याबोलण्याच्या रीतीभाती शिकते आणि नंतर एका इंग्लिश माणसाशी लग्न करून स्थिरस्थावर होते; परंतु तिच्या हृदयात खोलवर तिच्या छोट्या मुलीचं रडणं अजूनही घुमत असतं...