शांताराम
9788184780530 Anuvadit Aparna Velankar Gregory David Roberts Kadambari Mehata Publication Mehata Publishing House Mehta Publishing Mehta Publishing House Novel Shanataram Shantaram Translated Translation अनुवादित अपर्णा वेलणकर कादंबरी ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स मेहता पब्लिशिंग हाऊस शांताराम
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 995 R 746 / $ 18.00
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
दूर देशाहून आलं होतं एक गोरं पाखरू. पळून आलं होतं. तुटलं होतं माणसांपासून...मातृभूमीपासून...जगण्यापासूनच ! मागावर असलेले पोलीस आणि स्वत:च्या डागाळलेल्या आयुष्याची लाज वाटणारं मन यापासून त्याला पळून जायचं होतं... लपून राहायचं होतं. ते उतरलं होतं मुंबईत. अंधारी, काळी, कलकलाटाची दुनिया, पिचलेली... तरीही ताठ उभ्या कण्याची ! क्षणात नरडीचा घोट घेणारी, क्षणात प्रेमाची पाखर घालून पोटाशी कवटाळणारी ! घर सुटलेलं, कुटुंब तुटलेलं, जिवलग दुरावलेले, अशा शून्य अवस्थेत भिरभिरणारं ते एकटं पाखरू शिरलं मुंबईच्या कुशीत. - आणि बघता बघता सारं बदललं. एक नवीच दुनिया उलगडत गेली. प्रेमाचा पाऊस... द्वेषाचा जाळ... विश्वासघाताचे सुरे... रहस्यांचे चक्रव्यूह आणि गुपितांच्या गुहा ! शरीरसुखाच्या उफाळत्या लाटांवर नाचणारा उत्कट प्रणय आणि तुरुंगाच्या अंधारकोठडीतला रक्तरंजित छळ. जगण्याच्या लढाईने पेटलेल्या झोपड्या आणि पंचतारांकित हॉटेलातलं थंडगार ऐश्वर्य. अंडरवर्ल्डमधल्या टोळीयुद्धांच्या चिखलात रुजलेली तत्त्वज्ञानाची कमळं आणि बॉलीवुडच्या झगमगाटाआडचा सुन्न अंधार. या कहाणीत काय नाही ? तिच्या पोटाशी आहे पंखांवर खिळे ठोकणा-या नियतीला झुगारून, जगण्याचा अर्थ शोधत भिरभिरणारं एक पाखरू, त्याच्या पंखांवरचे प्रेमाचे रंग आणि एक शहर - मुंबई.
Book Review
Write a review

Dr.Madan Jadhav
30/09/2024

एक भन्नाट कादंबरी. ऑस्ट्रेलियाच्या तुरुंगातून फरार झालेला एक कैदी मुंबईच्या पडद्यामागच्या दुनियेमध्ये स्वतःची ओळख लपवून आसरा घ्यायला येतो आणि तो या शहरामध्ये बेमालूमपणे कसा मिसळून जातो याचे अतिशय सुंदर वर्णन या १४०० पानांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरी मध्ये लेखकाने केलेलं आहे. दक्षिण मुंबईच्या पॉश' भागामध्ये, कॅफे लिओपोल्डच्या वरकरणे ग्लॅमरस दिसणाऱ्या दुनियेच्या खऱ्या अंतरंगांचे मती गुंग करणारे वर्णन, मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्याचे यथार्थ वर्णन, ऑर्थर रोड तुरुंगातील कैद्यांच्या दैनंदिन राहण्याचे अंगावर काटा आणणारे वर्णन, या सगळ्यांच्या सोबत रशिया आणि अमेरिका या महासत्तांनी सुरू केलेल्या अफगाणिस्तान मधील युद्धाचे थरकाप उडवणारे वर्णन या महाकादंबरीमध्ये आलेले आहे. आपल्यासारख्या मराठी वाचकांना कदाचित मुंबई येथील वर्णन वाचून, ॰यात काय नवीन॰ अशी भावना निर्माण होऊ शकते. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका 'wanted' कैद्याच्या नजरेतून या शहराकडे बघताना एक वेगळाच फील येतो. मला सगळ्यात जास्त आवडलं काय असेल तर अनुवाद. १४०० पानांची ही महाकादंबरी वाचताना आपण अनुवाद वाचतोय असं कुठेच जाणवत नाही. याबद्दल अपर्णा वेलणकर यांचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे.
universal group
06 Dec 2022 05 30 AM

Best book I have read so far. May be 5 - 10 % imaginary and not 70 % as someone has written above.
Mahendra Kulkarni
30/08/2016

एक परदेशी गुन्हेगार भारतात येतो आणि मग इथलाच होवून राहतो. आत्मचरित्राच्या नावाखाली जवळपास १००० पानांचं एक थोतांड. माझ्या मते फार तर ३०% सत्य आणि ७०% कल्पना. मुंबईतल्या अंडरवल्ड मध्ये हिरोगिरी करून, अनेक बदले वगैरे घेऊन, एकेकट्याने हाणामाऱ्या करून, समाजकार्य करून समाधान होत नाही म्हणून अफगाणिस्तानात जाऊन लढून, जिवंत परतलेल्या एका साहसावीराची सुरुवातीला खरी वाटणारी आणि नंतर नंतर कल्पनाविलासात भरकटलेली कादंबरी. जबरदस्त "मार्केटींग" मुले अपेक्षा उंचावणारी एक पोकळ कथा एवढंच मला म्हणता येईल. अपर्णा वेलणकरांनी केलेला अनुवाद मात्र मानावा लागेल. संपूर्ण पुस्तक मराठीतच प्रकाशित करून मग त्यावरून इंग्रजी अनुवाद केला असावा असं वाटावं इतपत उत्कृष्ठ अनुवाद.
gurunath deshpande
03 Apr 2012 05 30 AM

Sundar anuvad. kahi bhag anavshyak vatato tyamule vachatanachi maza nighun jate. Pan ekandarit pustak changale aahe.
Mandar Joglekar
22/02/2011

अपर्णा वेलणकर यांनी खूपच सुरेख अनुवाद करून ग्रेगरीच सार आयुष्य डोळ्यासमोर उभे केले आहे की जणू आपण चित्रपटच पाहत आहोत असे वाटते. अत्युतम लेखन शैली!! वाचालच पाहिजे असं पुस्तक!!
shravan chivilkar
18/01/2011

खूप छान आहे. माझ्या आयुष्यातली अशी पहिली कादंबरी जी मी वाचली आणि त्यातलं एकही पात्र मला माझ्यात आहे असं वाटल नाही. पण लेखकाने सगळं इतकं सविस्तर लिहिलं नसतं तर वाचायला खूप कमी वेळ लागला असता आणि आणखी जास्त मजा आली असती.
nitin lokhande
09 May 2010 05 30 AM

खूपच छान आहे
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat