Summary of the Book
आठवणींचा कल्लोळ
भावनांचा वाणवा लागला
आणि मी पेटलो....
मला आठवत राहिले,
ते दिवस....
तेच ते आपले मोहरणारे क्षण
बेधूंद, बेहाल करणाऱ्या
त्याच त्या आठवणी....
संवाद आणि ते शब्द
यांनी झोपच उडवली माझी..
जळफळाट होत होता
देहमणाचा....
अस्वस्थेवरच वार
कावरं- बावरं होवून,
अंगाला झोंबत होतं....
रानराण पेटलं होतं
मणात माझ्या..
शब्द हो जळत राहिले
जाळत राहिले....
दिली साथ लेखनीने,
दिला आधार कागदाने
असा उभारलो मी, असा सावरलो मी
कॉलेजचे दिवस आठवता
शब्दात खेळतो मी, कवितेतून जगतो मी