Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
हे संक्षिप्त पण अगदी निराळे पुस्तक जगभरातील मानवी इच्छा अपेक्षांचा कसा चुराडा झाला, इस्त्राएलचा इतिहास, इस्त्राएलची देवाने जगाच्या मुक्तीच्या योजनेसाठी केलेली निवड व त्यास इस्त्राएलचा नकार, आपल्या इस्त्राएली मित्र बेनला पत्राद्वारे इस्त्राएलने जगाच्या मुक्तीसाठी प्रयत्न करावेत हे त्यांच्या धर्मग्रंथाच्या आधारे केलेले आव्हान, तसेच सध्याच्या इस्त्राएलचे आंतरराष्ट्रीय घडामोडींशी व जगाच्या अंताशी असलेले संबध बायबलच्या भविष्याप्रमाणे कसे जोडलेले आहेत हे पुरावा म्हणून दाखवते.
जगाच्या अंत:काळाची बायबलवर्णितचिन्हे: प्रदुषण, ग्लोबल वॉर्मिंग, अतिरेकी, भ्रष्टाचार, आत्महत्या इत्यादी गोष्टी आपण अकल्पनिय महाकोपाच्या अगदी नजिक आहोत व त्या गोष्टी जागतिक अर्थव्यवस्था अचानक एका रात्रीत नष्ट करणारा आघात कसा करवणार? त्या नंतर जगाचा अंत करणारी महासंकटांची सात वर्षे व त्या नंतर उदय होणारे नवे युग कसे असेल याचे अगदी तर्कशुद्ध, रास्त व संयुक्त वर्णन करणारी संदर्भशृंखला स्वतःच त्यांची सत्यता प्रमाणित करते. हे पुस्तक प्रथमच जगाच्या अंताविषयक बायबलमधील गुप्त सांकेतिक संदेश संदर्भासहित उलगडून जगासमोर मांडते.
तसेच सध्याच्या दुर्दैवी निराशेच्या खाईत असलेल्या मनुष्य जातीस खात्रीपूर्वक आशेचा किरण दाखविते. नव्या युगाची पहाट, शांती, प्रेम, आरोग्य, आनंद व समाधानाने भरलेली असेल असे आश्वासन देते. तसेच होणाऱ्या कोपापासून बचावासाठी जगातील प्रत्येकाच्या रहाणीमान व जीवनात विश्वासपूर्वक आमूलाग्र बदल करण्याची निकड जाणवते पण त्याच बरोबर आमच्या अनुभवावरून हे ही लक्षात येते की या पृथ्वीवरील मानवाचे मन व सवयी कधीही बदलणाऱ्या नाहीत, त्यामुळे देवाच्या होणाऱ्या कोपाचे भविष्य अटळ आहे व त्या बरोबरच देवाच्या पूर्व नियोजित राज्याचे आगमनही निश्चित आहे व हेच सत्य आहे आणि म्हणून आम्ही ताठ न होता नम्र होऊन त्याचा स्विकार करावा यातच आपले शहाणपण आहे.