Summary of the Book
मराठी साहित्याच्या प्रांगणातील अनेक नियतकालिके आणि प्रकाशन संस्था हळूहळू अस्तंगत होत चाललेल्या असतानाच्या काळात म्हणजे १९९५ मध्ये 'अंतर्नाद' नावाचं एक नियतकालिक पुण्यातून प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. प्रथमदर्शनीच या अंकाचं वेगळेपण जसं लक्षात येत होतं, त्याचबरोबर हा अंक काढणारे भानू काळे यांची बदलत्या जगाकडे पाहण्याची आगळी दृष्टीही ध्यानात येत होती.