Summary of the Book
विकसन देशाकडून विकसित देशाकडे भरारी घेण्याचे बळ भारताच्या पंखात आहे. सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख होऊ लागली आहेच. शिवाय बौद्धिक ज्ञान आपल्याकडे विपुल आहेच. प्राचीन संस्कृती ठेवा, एकत्रित समाज व्यवस्था, कौटुंबिक पाठबळ आहे.
पण तरीही वाढती लोकसंख्या, दारिद्र्य, निरक्षरता, जाती - धर्माच्या भिंती, सामाजिक कारणावरून होणाऱ्या दंगली, हिंसाचार, पर्यावरणाचा ऱ्हास, विजेचे संकट अशी आव्हानेही आहेत. यावर मात करीत भारताला प्रगतीच्या वाटेवर नेता येईल हे स्वप्न दाखवीत ते पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल, याचा मंत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी 'शोध नव्या भारताचा 'मधून दिला आहे.
बालकेंद्रित शिक्षण, महिलाकेंद्रित कुटुंब, मानवकल्याण विकास, ज्ञानकेंद्रित समाज, नवनिर्मितीकेंद्रित भारत या पंचशीलाचा वापर करून नवीन भारताची निर्मिती कशी करता येईल, हे यात सांगितले आहे.
नक्कल करण्यापेक्षा शोध, संशोधन करून नवनिर्मिती करण्याची गरज आहे.कल्पनांची भूमी असलेला भारत अमेरिकेप्रमाणे संधीचा देश बनायला हवा, तंत्रज्ञान व उद्योग यांची सांगड घालायला हवी. याविषयीची विस्तृत माहिती त्यांनी दिली आहे.