Summary of the Book
स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या युनिक ऍकॅडमीने गेल्या तीन वर्षांपासून राज्याचा सर्वांगिण आढावा घेणारा महाराष्ट्र वार्षिकी 2012 हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यास सुरवात केली आहे. या वर्षीचा हा चौथा अंक. 1160 पानांचा हा महाग्रंथ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर अत्यंत उपयुक्त आहेच; पण राज्याचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे. या पुस्तकात अद्ययावत माहिती आणि घटना याची माहिती सविस्तरपणे देण्यात आली आहे.
दहा विभागांत राज्यातील विविध क्षेत्रांतील माहिती देण्यात आली आहे. राज्याचा इतिहास, सांस्कृतिक वाटचालीचा आढावा, भूगोल तसेच राज्याची शासकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था या विषयावरील अभ्यासपूर्ण लेखांचा यामध्ये समावेश आहे. विविध क्षेत्रांतील नियुक्त्या; तसेच पुरस्काराची माहिती यामध्ये आहे. बालकल्याण विभाग आणि महिला विकासाच्या योजनांचाही यामध्ये समावेश आहे. राज्यातील एखाद्या प्रश्नावर कुणाला लिहायचे असेल, काही माहिती हवी असेल तर हे पुस्तक आवश्यक आहे.