Summary of the Book
पद्मभूषण पंडित विनायकराव पटवर्धन यांची सून डॉ. सुधा पटवर्धन यांनी ही दोन पुस्तके लिहिली आहेत. एकेक रागातील विविध तालांतील चीजा त्यांनी येथे दिल्या आहेत. संगीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वतोपरी विकासाचे उद्दिष्ट ठेवून हे पुस्तक लिहिले आहे. पहिल्या भागात 21 रागांची माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात 28 रागांची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक रागाची सविस्तर माहिती, बरेच आलाप व ताना यासंबंधीची माहिती यामुळे पुस्तक संगीत शिकणाऱ्यांना सखोल मार्गदर्शन करते.
"संगीत कला विहार' या मासिकाचे पाच वर्षे त्यांनी संपादन केले आहे. सध्या उत्तर प्रदेशातील हाथरस येथून निघणाऱ्या "संगीत' मासिकाच्या त्या संपादक आहेत. रागाची माहिती विविध तालांतील ख्याल, ध्रुपद, धमार, तराने आणि अष्टपदी यांमुळे विद्यार्थ्यांना हे पुस्तक खूप महत्त्वाचे ठरते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, या दोन्ही पुस्तकांत पलुस्कर लिपी आणि भातखंडे लिपी अशा दोन्ही रचना दिल्या आहेत. त्याचबरोबर दोन्ही भागांचीही किंमत कमी ठेवण्यात आली आहे.
संगीताचे विद्यार्थी, शिक्षक या सगळ्यांसाठी ही पुस्तक मालिका महत्त्वाची आहे.