Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/
$
5.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
जन्माने भारतीय असलेले लक्ष्मी मित्तल हे ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. यशस्वी उद्योजक होण्यासाठी जे कसब अंगी लागते ते मित्तल यांच्यात असल्याचे दिसले ते अर्सेलर या बलाढ्य पोलाद कंपनीसाठी त्यांनी बोली लावली तेव्हा.
तेव्हापासून युरोपच नव्हे, तर संपूर्ण जगात त्यांचे नाव झाले. ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी कार्यकारी प्रभारी गी. डोल व मित्तल यांच्यामध्ये जो संग्राम झाला त्याचा परिणाम जगात झाला.
या हस्तांतराची कहाणी ‘कोल्ड स्टील’मध्ये टीम बुके व बायरॉन उसी यांनी कथन केली आहे. त्याचा मराठी अनुवाद सुभाष जोशी यांनी केला आहे.
पुस्तकातील काही वाक्ये :
"गी, मी लक्ष्मी मित्तल बोलतो आहे. मी केवळ औपचारिकपणे तुझ्या कानावर घालण्यासाठी हा फोन केला आहे, की उद्या मित्तल स्टील तुझ्या भागधारकांच्यासमोर आर्सेलरच्या शेअर्ससाठी थेट प्रस्ताव मांडणार आहे." - लक्ष्मी मित्तल
"खरं सांगू का, मी त्या भारतीय माणसाच्या एकदम विरोधात होतो," तो म्हणाला. "ही आमची कंपनी आहे त्या भारतीयाला ती घेण्याचा काहीच हक्क नाही; पण एक सांगू, आता वाटतं, त्या भानगड्या रशियन माणसापेक्षा भारतीय माणसाशी झालेला स्वच्छ व्यवहार मी केव्हाही मान्य करीन..." - लक्सेम्बर्गचा टॅक्सी ड्रायव्हर
"भारतीय वंशाचा एक उद्योजक जगातील पहिल्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक झाला आहे, याचा मला अभिमान आणि आनंद वाटत आहे..." - अर्थमंत्री पी. सी. चिदंबरम
"एक वर्षापूर्वी फ्रान्समध्ये तू आंगतुक होतास; पण आता परिस्थिती बदलेली आहे," असं म्हणत जॅक शिराकने हसून मित्तलशी हस्तांदोलन केलं आणि म्हणाला "आता फ्रान्समध्ये सर्वत्र तुझं स्वागतच केलं जात आहे." - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक
"ही तर एकप्रकारची लढाईच आहे," जॉन कास्टेगन्रोने जाहीर केलं. "आपण आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढलं पाहिजे." मित्तलचा प्रस्ताव आर्सेलरच्या संचालकमंडळाने एकमुखाने फेटाळून लावला.