Hard Copy Price:
R 100
/ $
1.28
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
`उडत्या पाखराची पिसं ज्याला मोजता येतात, तोच या जगामध्ये यशस्वी होऊ शकतो,’ अशा आशयाचं एक प्रसिद्ध वचन आहे. याचा अर्थ बदलत्या काळाची चाहूल ज्यांना योग्य वेळी घेता येते, आणि त्याला अनुसरून जे अचूक पावलं टाकू शकतात, तेच विजय पताका मिरवू शकतात. नव्या सहस्त्रकात विविध प्रकारच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांमुळे नोकरी-व्यवसायाची अनेक पारंपरिक क्षेत्रं लयाला गेली आहेत, तर अनेक नवीन क्षेत्रं उदयाला आली आहेत.
करिअर नियोजन करणार्या तरुणांनी सुद्धा झापडं लावल्याप्रमाणे साचेबंद स्वरूपाचे निर्णय न घेता, नोकरी-व्यवसायाच्या नव्या दिशा, नव्या वाटा आत्मविश्र्वासाने धुंडाळायला हव्यात. संगणक, पर्यावरण रक्षण, वनसंरक्षण, औद्योगिक छायाचित्रण, पर्यटन, फॅशन डिझायनिंग, इंटिरिअर डेकोरेशन, सौंदर्य मार्गदर्शन, आहार मार्गदर्शन, जाहिरात, फार्मसी यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये `स्काय इज दि लिमिट’ वाटेल अशा प्रकारच्या नोकरी-व्यवसायाच्या आणि बढतीच्या संधी महत्त्वाकांक्षी तरुणांची वाट पहात आहेत. नोकरी-व्यवसायाच्या अशा अनेक नवनवीन क्षेत्रांची आणि करिअर पर्यायांची अद्ययावत, अचूक आणि परिपूर्ण माहिती ललितरम्य भाषेत आकर्षकपणे सांगणारं हे पुस्तक- `नोकरी-व्यवसायः नव्या दिशा, नव्या वाटा’
करिअर नियोजन करू इच्छिणारे महाविद्यालयीन तरुण, नोकरी शोधणारे सुशिक्षित बेरोजगार युवक आणि नोकरी-व्यवसायात यशप्राप्तीसाठी धडपडणार्या मध्यमवयीन व्यक्ती यांनी वाचलीच पाहिजेत अशी डॉ. सुहास जोशी-सौ. विद्या जोशी यांनी लिहिलेली मॅजेस्टिक प्रकाशन संस्थेची आणखी दोन पुस्तके- `मनपसंत नोकरी मिळवण्यासाठी...’ आणि `कशासाठी? – पोटासाठी... यशस्वी होण्यासाठी!’