Summary of the Book
श्वासाला कुठं असतो धर्म?
अंगातल्या रक्ताच्या रंगाला कुठं असतो धर्म?
अन्नालाही धर्म नसतो. माणसाच्या मनातल्या वासनांनाही धर्म नसतो. माणसाच्या जन्मालाही नसता धर्म न् मृत्यूलाही नसतो धर्म. तरीही माणूस आयुष्यभर धर्म नावाचं वांझोटं बेगड कशाला अंगावर बाळगतो? माणूस धर्माशिवाय जगू शकतो का? निश्चितच, जगलू शकतो! माणूस कुठल्याही भेदांशिवाय तगू शकतो का?
निश्चितच तगू शकतो! ज्या दिवशी हे जग सगळे धर्म आणि सगळे भेद यातून मनापासून मुक्त होईल- त्या दिवसापासून या जगाचं खरं जगणं सुरू होईल!