Summary of the Book
किनवा ब्रेकफास्ट, हॅश ब्राऊन्स भरीत, कॉर्न सालसा, कॉर्नमील इडली, मँगो पाय, फिलो रोल्स, गार्लिक पिटा, मसाला वॉफल्स, टॉर्टीया बेक, कुसकुस खिचडी, मार्शमेलो डिलाईट..... ही कसली नावे, असे वाटतेय का? आजचा जमाना स्वदेशी नि परदेशी यांच्या फ्युजनचा जमाना आहे. मग आपले खाणेही असे फ्युजन का नको? वसुंधरा पर्वते यांनी अशी फ्युजन डिश आपल्यासमोर पेश केली आहे. या डिशमध्ये इतक्या नाना चवीचे पदार्थ आहेत की मूळ पदार्थाचा विसरच पडावा!
या पुस्तकात पदार्थांनुसार भाग केले आहेत. किनवा, हॅश ब्राऊन्स, कॉर्न आणि कॉर्नमील, पफ पेस्ट्री, पाय क्रस्ट, पिझ्झा क्रस्ट, किलो पेस्ट्री, क्रिसेंट रोल्स, पिटा ब्रेड, टॉर्टीया, नूडल्स-पास्ता, कुसकुस, पॅनकेक मिक्स, वॉफल्स, टोफू, अॅव्हाकॅडो आदी विभाग ढगांतले हे पदार्थ करून तर पाहा.