Summary of the Book
'ज्या लोकांना असा वेडा विश्वास असतो, की ते जगही बदलू शकतात... तेच जग बदलतात.' 'अॅपल'च्या या जाहिरातीप्रमाणेच स्टिव्ह जॉब्सनं जग बदलून दाखवलं. त्याचीच ही कहाणी. जॉब्सच्या सुमारे ४० मुलखाती घेऊन लेखक वॉल्टर आयझॅक्सन यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. विलास साळुंखे यांनी या पुस्तकाचा रसाळ अनुवाद केला आहे.
या सर्जनशील व्यक्तिमत्वामुळे सहा क्षेत्रांमध्ये क्रांती झाली. ती म्हणजे कम्प्युटर, अॅनिमेटेड चित्रपट, संगीत, फोन, टॅब्लेट कम्प्युटर आणि डिजीटल प्रकाशन व्यवसाय. जॉब्सच्या या कार्याचा आलेख पुस्तकात येतो. जॉब्स आणि त्याच्या कुटुंबियांच्या छायाचित्रांचा समावेशही पुस्तकात केला गेला आहे.