Summary of the Book
नव्वदीच्या दशकात १९८५ नंतर भारतीय राजकारणाने वेगळे वळण घेतले. कॉंग्रेसचे वर्चस्व कमी होऊ लागले व आघाड्यांचे राजकारण सुरू झाले. अनेक पक्ष एकत्र येऊन आघाडी निर्माण होऊ लागली. प्रादेशिक पक्षांना यामुळे महत्त्व आले. त्याच वेळी जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. याचा परिणाम देशातील सामाजिक स्थितीवर झाला. या दशकातील राजकारण, लोकशाही व्यवहार, पक्षीय राजकारण, राजकीय अर्थकारण याचा आढावा सुहास पळशीकर यांनी ‘समकालीन भारतीय राजकारण’मधून घेतला आहे. एका ठराविक कालखंडातील राजकीय प्रक्रियेचे विश्लेषण यात आहे.