Summary of the Book
पाककृतींची पुस्तके अनेक असतात. शेफ विष्णू मनोहर यांची अशी २४ पुस्तके आहेत. २५ वे पुस्तक थोडे वेगळे असावे, हा विचार करीत त्यांनी 'विष्णूजी कि रोजनिशी ' हे पुस्तक डायरी स्वरुपात दिले आहे.
त्यात प्रत्येक पानाच्या अर्ध्या भागात रेसिपी व अर्ध्या भागात तारीख आणि नोंदीसाठी जागा ठेवली आहे. यात एखाद्या आवडत्या पदार्थांची नोंद करून ठेवता येईल. कोणत्या महिन्यात कोणते पदार्थ खाल्ले जातात, कोणता पदार्थ उपलब्ध असतात, त्यानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे.
नारळाच्या दुधातले आप्पे , गोंड चण्याचा हलवा, कॅबेज दोरोल, चिकन लबाबदार, कढाई गोबी, कोळाचे पोहे, पोळ्यांचे थालीपीठ, मधुमेही खिचडी, मिक्सफ्रूट पुडिंग, लावल सुसॅन, भूने अंडे कि करी, फलधारी कोफ्ता, कचुंबर, क्रिस्पी पोटॅटो रोल, मोड आलेल्या धान्याचे सूप,
पायनापल सरप्राईज, वाफवलेला बटाटेवडा, तहूर, दिलजानी, तांदळाचे फरे, पनीर जिलबी, मसाल्याची कारली, अवला पेठ, मैसूरपाक, क्रंची स्टीक आदी वेगवेगळ्या लज्जतदार पदार्थांची मेजवानी यात आहे. त्याचबरोबर स्वयंपाकासाठी उपयुक्त नवीन भांडी, त्यांचा उपयोग याची माहिती यात दिली आहे.