Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
आज भारतवर्षाची विविध क्षेत्रांत होत असलेली वाटचाल, धोरणांतील स्पष्टता आणि कणखर नेतृत्व पाहता जगद्गुरू भारताची लक्षणेठळक होताना दिसत आहेत. अगदी किशोर वयापासून ज्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनीआपले जीवन घडवले, ती व्यक्ती आज नेतृत्वस्थानी आहे. नव्याभारताची पायाभरणी सुरू आहे. अशावेळी जगद्गुरू भारत (विवेकानंद) आणि नवा भारत (मोदी) या संकल्पनांची सजग चर्चा व्हावी, या दृष्टीने एक प्रयत्न म्हणून या ग्रंथाची योजना आहे. या ग्रंथात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्याती असणारे विद्वान लेखकांनी लेखन केले आहे. त्यामुळे या ग्रंथाला सामूहिक चिंतनाचे रूप आले आहे.
पुस्तकाची संकल्पना अतिशय वेगळी, हटके आहे. कधीही पुढे न आलेली माहिती या ग्रंथातून पुढे आली आहे. नरेंद्र मोदी यांचे जीवन घडले कसे, त्यांच्यावर स्वामी विवेकानंदांचा अमिट ठसा कसा उमटला आहे, याचे संदर्भासह वर्णन यातील एका लेखात आहे. विशेष म्हणजे २६ वेगवेगळ्या दिग्गज लेखकांंनी या ग्रंथात योगदान दिल्याने ग्रंथ संग्राह्य झाला आहे. संदर्भ ग्रंथ म्हणूनही या ग्रंथाचे मोल आहे.