Summary of the Book
सातशे वर्षांपुर्वी मार्तंड जोशी नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेली दोन मुले म्हणजे सहदेव-भाडळी ही होय. त्यातील सहदेव हा ब्राह्मण स्त्रीपासून तर भाडळी ही अंत्य जातीतील स्त्रीपासून झालेली मुलगी होय. तीने वडीलांकडचे ज्योतिष शास्त्राचे ज्ञान आत्मसात केले व ते नंतर सहदेवाला शिकविले.
ह्याबाबत एक कथा प्रसिध्द आहे की सहदेवाने एका आध्यात्मिक उन्नतांची एक कवटी आणली होती व तो उगाळून पित होता व ती कवटी भाडळी ने ती चोरुन कुटून पिठ करुन पिऊन टाकली व तीला ज्योतिष्याचे ज्ञान प्राप्त झाले. परंतू तिच्या रचनांवरुन ही घटना सत्य असल्याचे पुरावे मिळत नाहीत.
तिच्या रचनांमध्ये अनेक समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये व आधीच्या ग्रंथामध्ये प्रगट झालेले विचार आपल्याला दिसतात. तिने केलेल्या रचनेवर तिच्या सामाजिक स्थानाचा परिणाम झालेला दिसून येतो. तिचे ज्ञान हे नंतर ''सहदेव-भाडळी'' ह्या नावानेच प्रसिध्द झाले आहे.