श्री गुरुस्तुती आणि श्री दत्तात्रय स्तोत्र
Aadhyatmik Bapat Guruji Dharmik Religion Religious Shree Gurustuti Shree Dattatraya Stotra Shri Gurustuti Ani Shri Dattatreystotra Shri Gurustuti Shri Dattatreya Stotra Spiritual V. V. Bapat Vasudev Bapat Vasudev Vaman Bapat Vasudev Vaman Bapat Guruji Yadnyeshwar Prakashan आध्यात्मिक धार्मिक बापट गुरुजी यज्ञेश्वर प्रकाशन वासुदेव बापट वासुदेव वामन बापट वि. वि. बापट
Not in Stock

 
Hard Copy Price: 10% OFF
R 375 R 338 / $ 4.33
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
आध्यात्मात सगुण व निर्गुण असा भेद न करता त्यांच्यातील परस्परसंबंधांना अनुसरून निर्गुण तत्वाचा पुरस्कार करणारे तत्वज्ञान व आध्यात्मिक जीवनात आवश्यक असलेली सगुणोपासना यांचा समन्वय श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) महाराज यांनी श्री गुरूस्तुती या स्तोत्रात साधला आहे.

भक्तिरसाबरोबरच तत्वज्ञानाचा भाग यात आहे. त्यांनी तुकाराम नावाच्या दत्तभक्तासाठी स्तोत्र रचून दिले. ते म्हणजे गुरूस्तुती हे मूळ नऊ श्लोकांचे निरुपण वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी केले आहे.

वैज्ञानिक बैठक, रोजच्या व्यवहारातील उदाहरणे यामुळे हे श्लोक समजण्यास सोपे आहेत. त्याप्रमाणे 'श्री दत्तात्रेय स्त्रोत्र' यात टेंबे महाराज यांनी दत्तात्रेयांची आर्ततेने व उत्कटतेने स्तुती केली आहे.

यात दत्तात्रेयांना उद्देशून निरनिराळ्या नामाने स्मरण करण्याचे प्रयोजन यामागे आहे. प्रत्येक श्लोकातील शब्दांचा अर्थ व त्यावरील विवेचन, असे या ग्रंथाचे स्वरूप असून, यातून दत्तात्रेयांचे माहात्म्य सर्वसामन्यापर्यंत पोचतो
Book Review
Write a review

साधक
26 Jan 2016 04 50 PM

श्रीगुरुदेव दत्त ! असं ज्यांना म्हटलं जातं, ते श्रीदत्तात्रेय आणि सदगुरुतत्त्व ह्यांच्यात वास्तविक कुठलाच भेद नाही. निर्गुण निराकार असणारे दत्तात्रेय भक्तांच्या उद्धारासाठी सगुणात येतात आणि आकार धारण करतात. त्यामुळे प्रत्येक सदेह सद्गुरु हा श्रीदत्तात्रेयांचाच अवतार असतो. निर्गुण-सगुणातलं हे अभिन्नत्व वाचकाला ‘श्रीगुरुस्तुति’ ह्या स्तोत्रातून समजून घेता येतं आणि निर्गुण दत्तात्रेयांच्या २९ गुणवैशिष्ट्यांचं वर्णन करणारं ‘श्रीदत्तात्रेयस्तोत्र’ अनुभवताना ते निर्गुणत्व आपल्या मनात सगुण रूपात साकारतं. सद्गुरु आणि दत्तात्रेयांचं अद्वैत सांगणारी प.प. टेंबे स्वामीमहाराजांची ही दोन्ही स्तोत्रं आणि त्यावरील सद्गुरूंनी केलेलं ‘सार्थ आत्मानुभूतीपूर्ण’ विवरण अभ्यासू आणि जिज्ञासू वाचकाला ‘भक्ती कशी करावी’ हे शिकवत ‘आत्मसाक्षात्काराचा’ जवळचा आणि सोयीचा रस्ता दाखवतात. ज्ञानाने परिपूर्ण अशी ही दोन्ही पुस्तकं वाचकांच्या विचारांमध्ये, वृत्तीमध्ये आणि पर्यायाने जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवण्यास निश्चित सहाय्यभूत होतील, ह्यात शंकाच नाही.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat