Summary of the Book
रमाबाई रानडे यांची प्रस्तावना लाभलेले हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे चरित्र १९२४ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाले होते. न्या. रानडे यांचा जन्म १८४२ मध्ये झाला. त्यांचे कोल्हापुरातील शिक्षण, बालपण, आदींपासून चरित्राला सुरवात होते. त्यानंतर मुंबईतील शिक्षण, भाषांचा अभ्यास, कायद्याचा अभ्यास, अध्यापनाचा अनुभव, नोकरी, समाजसेवा, सुधारणावाद, समाजातील स्त्रियांची स्थितीसंबंधी दृष्टिकोन, त्या अनुषंगाने केलेले कार्य, विधवा विवाहासंबंधातील कार्य, रुढी व परंपरेशी केलेला सामना, प्रार्थना समाजाचे काम, लेखन आणि त्यानंतर पुण्यात झालेली बदली या सर्व घडामोडी क्रमाक्रमाने येतात. पुण्यातील वास्तव्यामधील त्यांचे कार्य, रमाबाईसमवेतचे सहजीवन आदी गोष्टींचा मागोवा घेण्यात आला आहे.