Summary of the Book
मनाचा ठाव लागत नाही, असं आपण नेहमी म्हणतो. पण याच मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न लेखिका डॉ. विजया फडणीस यांनी केला आहे. मनुष्य स्वभावाचे अनेक नमुने येथे भेटतात. साधं, सरळ, रोजचं आयुष्य जगताना अनेक अडचणी येतात. अनेकदा आपल्यासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या मनातूनच आपल्याला मिळतात. विचार आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं त्यासाठीच महत्वाचं असतं चालू शतक हे डिप्रेशनचे जीवनावर अनेक परिणाम होतात. त्यामुळे हे नैराश्य घालवायचं कसं, याच मार्गदर्शन त्या पुस्तकाद्वारे करतात. स्वभावाला औषध कसं असतं, तेही त्या सांगतात. त्यासाठी मानसशास्त्रीय तंत्र कसं वापरायचं, याची माहिती त्या देतात. वाचक शिक्षक, समुपदेशक आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, अशी उदाहरणे त्यांनी दिली आहेत