Summary of the Book
कालिदासाचे मेघदूत हे जगातील एक सर्वश्रेष्ठ काव्य होय. अगोदरच कालिदास अलौकिक प्रतिभेचा कवी आणि त्यातून प्रतिभा पूर्णावस्थेला पोहोचल्यावर त्याने लिहिलेले हे काव्य. त्यामुळे या काव्याचा रसास्वाद घेण्यासाठी जगाने उत्सुक व्हावे यात आश्चर्य नाही. इंग्रजीतसुद्धा जर त्याची अनेक भाषांतरे झाली आहेत, तर मराठीच्या १०-१२ भक्तांनी ते मराठीत आणण्याचा प्रयत्न करावा हे साहजिक आहे. रा.प. सबनीस यांची मूळ संस्कृत श्लोकांवरील मराठी समश्लोकी उत्कृष्ट झाली आहे.