Summary of the Book
प्रत्येक संस्कृतीचा एक भाग म्हणजे भाषा. भारतासारख्या देशात असंख्य संस्कृती एकत्र नांदत असल्याने भाषाही अनेक आहेत. महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी भाषा ही कोसाकोसावर बदलत जाते. सकस मराठी भाषा व त्यात होत जाणारे बदल याचा वेध नीलिमा गुंडी यांनी ‘भाषाभान’मधून घेतला आहे. विविध प्रसंगांनुसार भाषा कशी बदलत जाते, शब्द कसे वळण घेतात, इतिहासकाळापासून आजच्या तरुणांमध्ये बोलल्या जाणार्या भाषेतील बदल, मराठीची आजची स्थिती, पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील मराठी, याचा समावेश यात केला आहे. भाषाभान कसे येते व ते का कायम ठेवावे, याचे महत्त्व यामुळे कळते.