Hard Copy Price:
25% OFF R 420R 315
/
$
4.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
झोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्याशी झोंबणे. ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी.
या कादंबरीत फक्त शिकण्यासाठी भोगलेल्या व्यथाच आहेत असे नाही तर दरिद्री, अज्ञानी, ग्रामीण कुटुंबाचे, भीषण दारिद्र्याचे ते विश्वरूप दर्शन आहे. लेखकाचे गाव, गावातील रितीरिवाज, निसर्ग,बापाचा आडमुठेपणा,आईचा होणारा अपरिमित छळ,लागोपाठ होणारी मुले,मुलांचे अपमृत्यू,शाळेतील प्रसंग, मास्तरांचे स्वभाव,तर्हा,गावातले उरूस,जत्रा,गांधीवधानंतर झालेली स्थिती...अशा अनेक गोष्टींचे वास्तव चित्र आहे. या कादंबरीचा आवाका खूप मोठा आहे.
झोंबी हे आत्मचरित्र कादंबरी रूपात लिहिताना आनंद यादवांनी आपली कुणी कणव करावी अशी भूमिका घेतलेली नाही. एका सहृदय चिंतनशील माणसाने आपल्या बालपणी भोगलेल्या व्यथा इथे शब्दरूप केलेल्या आहेत.
वाचकांना अस्वस्थ करण्याचं प्रचंड सामर्थ्य या कादंबरीत आहे. दारिद्र्याचे श्रीमंत चित्रण करणारी कादंबरी.
झोंबी- आनंद यादव (जन्म नोव्हेंबर 1935)
खेड्यात राहणाऱ्या लेखकाचे हे आत्मचरित्र आहे. शिकू पाहणाऱ्या पिढीचा हा संघर्ष आहे. खेड्यातील शेतकऱ्याच्या घरातील भरपूर मुले, दारिद्र्य, शिक्षणाबद्दलची अनास्था, दुष्काळ, शेतमालकाने फसवल्याने झालेली दशा, शाळा शिकताना फ्रीशिपसाठी केलेली धडपड आणि जगण्यासाठी दोन घास मिळावे म्हणून केलेला संघर्ष म्हणजे "झोंबी".
"साळा शिकून काय बी उपेग न्हाई. शेवटी हात शेनामुतातच घालायचं, भटा-बामनाने साळा शिकावी." अशी मानसिकता लेखकाच्या वडिलांची होती पण शाळा शिकूनच या सगळ्या दारिद्री चक्रातून बाहेर पडू शकतो हे त्यांच्या मनाला पटलं होत, हायस्कूल मध्ये इतर सधन वर्गासारखी शिफारसपत्र नसल्याने फ्रिशिप न मिळुन, अतिशय तुच्छ वागणूक मिळत असून सुध्दा शिक्षणाची जिद्द सोडली नाही. त्यांच्या सोबत विनोबांचे विचार होते. मन अस्वस्थ करणारं आत्मचरित्र. पुस्तकातील कोल्हापुरी बोली भाषा खूप जवळची वाटली.
Ajay s k
15/08/2020
Apratim kadambari
Anushka Suhas Ahire
15/11/2019
Khup chan book aahe kharach. Ekda he book hatat ghetle na aapan lavkar sodnar nahi ase.book read kartana nakalat dolyatun ashru vahu lagtat.tyatla prasang aplya dolyasamor ghadto aahe as vatte.I love this book indeed.
Sachin Korgaonkar
29/12/2018
शिक्षणाचे महत्व आयुष्यात प्रथम समजले ते ह्याच पुस्तकातून. शाळेत असताना आम्हाला 'पाटी आणि पोळी' हा धडा होता. तेव्हापासून हे संपूर्ण पुस्तक वाचायचे ठरविले होते. थँक्स BookGanga
anant sonawane
18/08/2015
lakshyaat rahil ase pustak... khupach chaan...
amol khule
18/07/2015
excellent....!
kharch chaan aahe..
Sushil Shinde
30/04/2015
Very Nice book!! worth reading!!
vinay vekhande
16/08/2011
hrudayala madhe ghar karun ladnyasathi prerana denare lekhan