Summary of the Book
लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षा पार करणं, कोणत्याही विद्यार्थ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असते. अमृतेश्वर औरंगाबादकर या युवकाने २०११ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा यशस्वीपणे पार केली. या यशामागची कहाणी त्यांनी सांगितली आहे.
विषयांची निवड, परीक्षेसंदर्भात माहिती, प्रिलीम, अभ्यासक्रम, परीक्षेकडं पाहण्याचा दृष्टिकोन, मुख्य परीक्षेतील प्रश्नांचं विश्लेषण, उत्तरं कशी लिहायची आदीसंबंधी विस्तृत माहिती औरंगाबादकर यांनी दिली आहे.
वृत्तपत्रं, मासिकं, इंटरनेटचा वापर अभ्यास करताना कसा करायचा या माहितीसह पुस्तकात प्रश्नोत्तरांचा समावेशही करण्यात आला आहे.
या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी 'स्मार्ट वर्क' आणि 'हार्ड वर्क' यांचं एकत्रिकरण आवश्यक आहे, असं औरंगाबादकर सांगतात, त्यांच्या यशाचा हाच मंत्र आहे.