Summary of the Book
साहित्य, कला प्रांतातील दिग्गजांचा सहवास मिळणे सर्वांनाच शक्य नसले, तरी त्यांच्याबरोबर दोन क्षण मिळावे, किमानपक्षी त्यांचे दर्शन व्हावे, अशी इच्छा अनेक कलाप्रेमींना वाटत असते. अशी इच्छा पूर्ण होणाऱ्यापैकी एक म्हणजे कवी व साहित्यिक प्रवीण दवणे.
गेल्या शतकातील आणिक मोठी माणसे त्यांनी पहिली. काहींचा सहवास लाभला, तर काहींचे दर्शन झाले. अशा माणसाचा ध्यास, कामातील अचूकतेसाठी केले जाणारे अथक प्रयत्न त्यांनी पहिले. अशा व्यक्तींचे मोठेपण त्यांनी 'गाणारे क्षण 'मधून सांगितले आहे.
मंगेशकर कुटुंबियाबद्दलचा आदर येथे अनेक ठिकाणी दिसतो. शांताबाई शेळके, विद्याधर गोखले, राम शेवाळकर, वि. वा, शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, भालजी पेंढारकर, कुमार गंधर्व, पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अनिल मोहिले, भक्ती बर्वे, मंगेश पाडगावकर, कवी ना. घ. देशपांडे, अरुण दाते, अमृता प्रीतम, अरुण पौडवाल यांच्या सहवासातील क्षण, त्यांच्याकडून मिळालेली शाबासकी, लेखनाला प्रोत्साहन याविषयीच्या आठवणी त्यांनी यात दिल्या आहेत.
स्वामी समर्थ, तुकाराम महाराज, टेंबे स्वामींविषयी ते भक्तिभाव व्यक्त करतात.