Summary of the Book
समाजकार्य करणे ही फॅशन झाली आहे; पण आजही तळमळीचे कार्यकर्ते सामासाठी काम करीत आहेत. वंचितांसाठी लढत आहेत. अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे काम, त्यांचे अनुभव 'कार्य आणि कार्यकर्ते' मधून वाचायला मिळतात. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत अग्रभागी असणारे अमर हबीब, रायगड जिल्ह्यातील आदिवासींसाठी काम करणाऱ्या उल्का महाजन, रायगडमधीलच शेतकऱ्यांसाठी झपाटणारे अरुण शिवकर, प्रयास-उर्जा गटाचे गिरीश संत, ग्राहकहिताचा लढा उभारणाऱ्या अनुराधा देशपांडे, नर्मदा बचाव आंदोलनातील योगिता खानोलकर, कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात महिलांच्या बाजूने लढणाऱ्या वकिल असुंता पारधे, पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करणारे प्रसाद सेवेकरी या आठ धडाडीच्या कार्यकर्त्यांच्या अनुभवातून समाजकार्य कसे असते, कसे चालते, कसे सिद्ध होते हे समजते. याचे संपादन मिलिंद बोकील यांनी केले आहे.