निरोगी शरीरसंपदा ही देणगी असली, तरी टिकवणे आपल्या हातात असते . यासाठी व्यायाम व आहाराला महत्त्व आहे . पण , तरी कधीकधी किरकोळ दुखणे होते . कधी गंभीर आजार जडावतात . त्यामुळे औषधोपचार करणे ओघाने येतेच . यासाठी विविध वनस्पतींचा वापर केलेली आयुर्वेदिक औषधे व त्यांचे गुणधर्म , ती बनविण्याची पद्धत , औषधे वापरण्याचे प्रमाण , याची माहिती प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी 'होण्या बरे-गोळ्या चूर्णे'मधून दिली आहे . स्वरस , कल्क , हिम , फांट , क्षीरपाक , पाक , लेप , औषधी तूप , पोटीस यांची माहिती देत औषधांची सूची , विविध चुर्णांची नावे दिली आहेत . एकेरी , मिश्र , गुटीका वटी , गोळ्या , सुवर्णयुक्त औषधे , तेले आदी प्रकरणामध्ये त्यातील घटकद्रव्ये , उपयुक्तता ; ते घेण्याचे प्रमाण , घटकद्रव्यांचा उल्लेख व त्यावर टिप्पणी दिली आहे . संबंधित औषधांवरील संशोधनांची माहितीही दिली आहे.
‘होण्या बरे- गोळ्या चूर्णे’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5025896467718219911