Summary of the Book
पं. नेहरूंच्या आत्मचरित्राचा संक्षिप्त मराठी अनुवाद कुमार वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. देशप्रेम, प्रामाणिक कष्ट, आधुनिकता आणि मानवता यांचा महान व विलोभनीय संगम पंडितजींच्या रूपात आम्ही पाहिला. तो एक प्रकारे या पुस्तकरूपाने आजच्या विद्यार्थांना दिला आहे. मूळ आत्मचरित्राचे अनुवादक, सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. ना. ग. गोरे यांच्या कुशाल लेखणीनेच हा संक्षेप केला असलामुळे तो किती यथायोग्य झाला आहे हे सांगणाची आवश्यकता नाही. व्यक्ती, निसर्ग, तुरुंगवास आणि ग्रंथ इतादींचा पंडितजींवर मोठा परिणाम झालेला होता. म्हणून तदनुषंगाने येणारी जिवंत वर्णने येथे समाविष्ट केली असून तात्त्विक व राजकीय वादविवाद गाळले आहेत. मुखत: पंडितजींच्या वक्तिमत्त्वाचा विकास कसकसा होत गेला याचेच चित्र येथे उमटलेले दिसेल.