Summary of the Book
स्वराज्याचे स्वप्नं पाहणारे व ते साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सध्याच्या कॉर्पोरेट जगाच्या भाषेत बोलायचे तर कॉर्पोरेट किंग होते. शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्यनिर्मिती केली. ती कशी केली हे समजवून सांगून उद्योग जगतात पाय रोवण्यासाठी त्यांचा आदर्श कसा घेता येईल, याविषयी नामदेव जाधव यांनी शिवाजी द कॉर्पोरेट किंग मधून मार्गदर्शन केले आहे.
कॉर्पोरेशनची सुरवात करण्यासाठीचे मार्ग, शिवरायांनी या संकल्पना कशा राबवल्या हे स्पष्ट केले आहे. कॉर्पोरेशनची सुरवात कशी व कोठून करावी, कॉर्पोरेशनचे ऑफिस व घर यात अंतर किती असावे, भांडवल निर्मिती कशी करावी, कर्मचारी कसे निवडावेत, कॉर्पोरेशनचा विस्तार केव्हा करावा, नाव काय द्यावे, संयम बाळगण्याचे महत्व, स्वतःचे ऑफिस, दुकान नसले तरी कॉर्पोरेशन कशी सुरु करता येईल, जे करायचे त्यापेक्षा काही वेगळेचं झाले तर? अशा विविध शंकांचे निरसन शिवाजी महाराजांच्या संवादांतून केले आहे.
शिवकाळ व आधुनिक काळाची सांगड घालीत कॉर्पोरेट जगतात. आपले स्थान कसे निर्माण करावे, हे यात सांगितले आहे.