Summary of the Book
अ-सत्यमेव जयते...?
होय... अ-सत्यमेव जयते असेच सुरू आहे... भारताच्या इतिहासाची अक्षम्य हेळसांड केली गेली... जाणीवपूर्वक पिढ्यानपिढ्या दिशाभूल केली गेली... ज्या भारतातून सोन्याचा धूर निघत असे, ज्या समृद्ध, वैभवसंपन्न भारताचा शोध घ्यायला कोलंबस आणि वास्को-द-गामा युरोपबाहेर पडले, ज्या भारताचा १८ व्या शतकापर्यंत जागतिक व्यापारात २४ टक्के वाटा होता, त्या भारताला योजनाबद्धरीतीने कलंकित करण्यात आलं, मानसिकदृष्ट्या अपंग बनवण्यात आलं, जे जे भारतीय ते ते अभद्र आणि सारे भारतीय कपाळकरंटे असं बिंबवण्यात आलं... सत्याचा सातत्याने विपर्यास करून असत्यमेव जयते अशा बेमुर्वतखोरपणे आरोळ्या ठोकण्यात आल्या...
सत्याचा संदर्भासहित शोध घेणारं, असत्याच्या भिंती जमीनदोस्त करणारं, खरा इतिहास ठामपणे मांडणारं, अभिजित जोग याचं अतिशय विलक्षण असं अभ्यासपूर्ण पुस्तक...
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने... तुमचे डोळे खाडकन उघडणारं, तुम्हाला अचंबित करणारं, तेजस्वी इतिहासाची खरी ओळख करून देणारं, भारताविषयीचा अभिमान जागृत करणारं एक अभूतपूर्व असं नवंकोरं पुस्तक प्रकाशित होत आहे...