Summary of the Book
पुस्तकाच्या नावावरूनच विषय लक्षात यावा. हे प्रशासन आहे जिल्हा स्तरावरचे. त्याचे अनेक पैलू पुस्तकात पहावयास मिळतात. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालिका आयुक्त यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. एकीकडे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि दुसरीकडे नागरिक, त्यांचे प्रश्न. या दोन्हींची कसरत सांभाळत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना वैयक्तिक जीवनात स्वास्थ्य मिळणे कठीण असते. या साऱ्याचे दर्शन लक्ष्मीकांत देशमुख आपल्या पुस्तकातून घडवतात. लोकशाही व्यवस्थेतील प्रशासकीय यंत्रणा आणि त्या अनुषंगाने येणारे विषय स्पष्ट होतात. सामजिक जाणीवा, समाजप्रबोधन यावर प्रकाश पडतो. समग्र अनुभव देणारा अन् अंतर्मुख करणारा हा प्रशासननामा वेगळा विचार करायला भाग पाडतो.