पंचकेदार पुस्तक नुसतं प्रवासवर्णन नाही. ते श्रद्धा आणि साक्षात्कार यांचं नातं अधोरेखित करतं! भाविकांना मार्गदर्शन सुद्धा करतं. आपण सुद्धा हे करू शकू असा विश्वास आणि प्रेरणा देतं! त्यात दिलेले फोन नंबर व नकाशा, आणि कथनाच्या ओघात येणारी माहिती खूपच उपयुक्त आहे. श्रद्धा हवी, मात्र फाजील आत्मविश्वास व अनाठायी उत्साह धोक्याचा, हे स्पष्ट बजावलं आहे. तिथे अडचणीत सापडलेल्याला मदत करताना आपपर भाव कसा नाहीसा होतो याचा वेधक उल्लेख वाचण्याजोगा आहे! तसंच हे पर्यटन नाही, यात्रा आहे, या दोन वाक्यातच मतितार्थ स्पष्ट करतं! या विषयावरचं, इतकं सविस्तर पुस्तक हे कदाचित पहिलंच असावं! लेखक व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन व त्यांना शुभेच्छा!