Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/ $
2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
भारतात एखादा दहशतवादी हल्ला झाला की त्याचे खापर भारतीय गुप्तचर संस्थांवर फोडले जाते. यावरूनच देशाच्या गुप्तचर संघटनांचे महत्त्व अधोरेखित होते. येथे काम करणाऱ्या व्यक्तींवर या संस्थेचे अस्तित्व अवलंबून असते. अमेरिकेच्या सी.आय.ए. या गुप्तहेर संघटनेचे मोठे वर्चस्व आहे. जगावर आपला दबदबा प्रस्थापित करणाऱ्या अमेरिकेच्या मागे सी.आय.ए. ही त्यांची गुप्तचर संस्था असल्याचे मानले जाते. जगभरात आपल्या हेरगिरीचे जाळे पसरविलेल्या या गुप्तचर संस्थेची माहिती, तिची कार्यपद्धती याचा आढावा पंकज कालुवाला यांनी ‘अमेरिकेची सी.आय.ए.’ या पुस्तकात घेतला आहे. ही संस्था सुरू होण्यामागची करणे, स्थापना आणि तिचा विकास व या संस्थेत काम करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेल्या कार्याविषयीचा आढावा लेखकाने घेतला आहे. या संस्थेने भारतात केलेल्या गुप्त कारवाया, विविध देशांमध्ये केलेल्या कारवाया, या संस्थेत असलेल्या स्त्रियांच्या कार्याचा आढावाही लेखकाने घेतला आहे. हे पुस्तक वाचताना माणसाच्या बुद्धिमत्तेने, त्याच्या कार्यशक्तीने अचंबित व्हायला होते. या संस्थेविषयी वाचताना जागतिक राजकारण व त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी उलगडत जातात.
तुम्हि लिहिलेलं " अमेरिकेची CIA" वाचतोय. खूप रोचक आणि सर्वस्वी अकल्पित माहिती वाचताना खूप छान वाटतंय. हे पुस्तक लिहिताना तूम्ही खुप मेहनत घेतली आहे हे लगेच लक्षात येतं. CIA ने केलेल्या कारवायांच्या नुसत्या नोंद न देता त्यामागची सर्वंकष पार्श्वभूमी, आंतरराष्ट्रीय संबंध, अगदी १५व्या शतकापर्यंत खोलात जाऊन केलेली मीमांसा, तसेंच त्या कारवायांचे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम वाचून माहितीत खूप मोठीं भर पडली. त्यासाठी धन्यवाद. इतिहास, साम्यवाद, वसाहतवाद, २ ही महायुद्धे, तसेंच Cuba, Israel, Vietnam, Korea ह्या आणि इतर देशांच्या राज्यक्रांती आणि स्वातंत्र्य युद्ध ह्यात खुप रस असल्या कारणाने सदर पुस्तक खुप उपयोगी पडलं. दोनच दिवसांत फडशा पाडला.
Yogesh Chile
18/01/2016
तुमच अमेरीकेची सी.आय.ए. वाचल....खुप छान माहिती दिली आहे आपण...मी अनेकांना रीफर केल आहे ते आणि मोसाद...
दैनिक लोकसत्ता
19/12/2015
प्रत्येक देशाची गुप्तचर संस्था असते. आणि ती आपल्या देशाचे हितंसंबंध जपण्याचा, इतर देशांवर नजर ठेवण्याचा आणि आपला वचक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. अमेरिका, रशिया आणि इस्रायल या देशांच्या सीआयए, केजीबी, मोसाद या गुप्तचर संस्थांचा जगभरात विशेष दबदबा आहे. सीआयए आणि केजीबी यांनी तर शीतयुद्धाच्या काळात एकमेकांच्या विरोधात कितीतरी कारवाया केल्या. तर या तिन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांची परिचय करून देणारी ही तीन पुस्तके. ही तिन्ही इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचा आणि इंटरनेटवरील माहितीचा आधार घेऊन लिहिलेली आहेत. या तीन संस्थांनी इतर देशांत केलेल्या कारवाया, राबवलेल्या मोहिमा, युद्धमोहिमा आणि हेरगिरी यांचा आढावा या पुस्तकांत घेतला आहे. या गुप्तचर संस्थांचे पराक्रम जाणून घेण्यासाठी, जाणून घ्यावेसे वाटणाऱ्यांनी वाचावीत अशी ही पुस्तके आहेत.
Siddhesh Samant
16/12/2015
Good book...Must Read.......
Kanchan Karai
16/12/2015
Good Book..................
Alhad(Chandu)Dhaneshwar
12 Dec 2015 05 30 AM
Hello,
I read your Book on C I A.
Your Book is very informative and cover a lot of Stories, associated with C I A. It must have taken quite a time of yours, to Collect and Select the Information.I appreciate your Efforts very warmly and wish you all the best for FUTURE ACTIVITIES.
Aniket Bhujbal
25/02/2015
hats off to author.. really nice book.. those who like know what is intelligence eye of country..must read this book..