Summary of the Book
कविता करण्यापेक्षा कविता होते असे म्हणतात. कविता कशावर करावी, याला काही मर्यादा नाहीत. कोणत्याही विषयावर कविता करता येते. सामाजिक, राजकीय याचबरोबर कुटुंबातील माणसांवरही कविता केली जाते. यात पती-पत्नीच्या नात्यावर अनेक कविता आहे. पण फक्त प्रिय पत्नीवर करणारे कवी विरळच.
राजीव बर्वे यांनी पत्नीसाठी एक-दोन नाही तर अनेक कविता केल्या आहेत. ‘मनबहर’ या त्यांच्या कविता संग्रहात त्या एकत्रित वाचायला मिळता. पारदर्शी, नितळ अशा या कविता प्रसंगानुरूप आहेत. त्या वाचताना एक वेगळा अनुभव मिळतो.