Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/
$
0.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
बदलत्या काळाची स्पंदने 'मायलेकरं’ ही एक दीर्घ कविता हेच खरे. कारण ती खंडकाव्य नाही किंवा कथाकाव्यही नाही. तसा तिचा गाभा भावकाव्याचाच आहे. भावकाव्याचे बीज असूनही पुनरुक्ती किंवा पाल्हाळ वाटू न देता तिचा पा दीर्घता गाठू शकला आहे, हे तिचे एक वैशिष्ठ्य म्हणायला हवे. एकाच ओढीचे, असोशीचे, कमीजास्त दाबाने निर्माण झालेले अनेकविध स्तर या कवितेत एकवटून आलेले दिसतात. तपशील येतोच, पण काव्याच्या रसायनाने त्याचे स्थूलत्व किंवा स्वयंअस्तित्व नाहीसे करून टाकलेले आहे. या रसायनाची पकड इतकी प्रभावी आहे की, अल्पविस्तार किंवा अतिविस्तार यांचे धोके गळून पडलेले आहेत. कवितेच्या प्रवहनासाठी योजनापूर्वक पाटाची बांधणीही झालेली जाणवत नाही. जाणवते इतकेच की, ही कविता आपल्या कलाने पुढे सरकते आहे आणि तोच तिच्यासाठी निश्चित केला गेलेला मार्ग आहे. वास्तविक; 'मायलेकरं’ सारख्या कवितेत तर्कशरणतेचा मोठा धोका संभवनीय होता. पण तो टळला गेलेला दिसतो. दर्शनी स्वरूपात 'मायलेकरं’ हा एक संवाद आहे. तो कुणी एक आई आणि तिचा मुलगा यांच्यातील आहे. त्यातही कलेचे वगैरे म्हटले जाणारे पथ्य सांभाळलेले नाही. म्हणजे आईचे, मुलाचे आलटून पालटून संवाद, त्याद्वारा साधलेली संवादात्मकता, त्यासाठी आवश्यक असलेली नाट्यात्मकता, सुभाषितांची पेरणी, शब्द-कल्पना-चमत्कृतींची सफाईदार चतुराई, उत्कंठावर्धक कथात्मकता वगैरे वगैरे विशेष या रचनेत नाहीत हे प्रथमच स्प करून घ्यायला हवे. इथे फक्त इतकेच सांगायचे आहे की, संवादात्मक दीर्घ-कविता असे म्हटल्यावर जे काही विशेष शोधायची आजवर रूढी पडून गेलेली आहे तिला मानणारे या कवितेचे स्वरूप नाही. या कवितेसाठी कवीने कल्पिलेली वस्तुस्थितीही तशी सर्वसाधारण; म्हणजे नेहमीचीच आहे. शिक्षण संपवून घरी परतलेल्या मुलाला पाहून आनंदलेली आई; आपली सारी स्वप्ने आता खरी होणार या अंदाजाने मुलापुढे मांडते आणि नवी नजर घेऊन परतलेला मुलगा आपली स्वप्ने भिन्न असल्याचे तिला सांगतो. नंतर काय होते वगैरे हकीकत या कवितेने आखून घेतलेल्या परिघाबाहेरची असल्यामुळे अर्थातच; कवीचा त्याच्याशी संबंध पोहोचत नाही. तेव्हा कसलेही असाधारणत्व नसलेली वस्तुस्थिती या कवितेच्या आधारस्थानी दिसते, हे स्पष्ट होईल. मात्र ही मायलेकरं ग्रामीण भागातली आहेत हे ध्यानी घेतले की काही वेगळे वाटू लागते. या कवितेतील आई ही आई आहेच, पण नुसतीच आई नाही. ती आहे एक ग्रामीण आई. अंतर्बाह्य ग्रामीण आई. तिचे सारे गुणधर्म शिवारातल्या काळ्या मातीचे आहेत. त्यावर सिमेटाचे शिक्के उठलेले नाहीत. तिच्या अपेक्षा, तिच्या सुखाच्या कल्पना, तिची स्वप्ने ही सारी सारी जमिनीशी बांधलेली आहेत. दैन्य हा तिचा वाट्याला आलेला जणू भोगच नव्हे, तर वारसा ठरावा. त्यामुळे तिची स्वप्ने ही मूठभर माणसांची दैनंदिन गरजही ठरू शकेल अशी तिच्याबाबतची वस्तुस्थिती आहे. तिचा मुलगा मात्र सिमेटाने डागाळलेला, पण भूमिपुत्रच आहे. शहरगावच्या सिमेटी संस्कारांमुळे तो अंतर्मुख झालेला आहे. त्याला त्याच्या आणि ज्या भूभागातून तो आला त्या भूभागाच्या दु:स्थितीची जाणीव झालेली आहे. त्याच्या परीने तो तिचा अर्थही लावू लागलेला आहे. आपल्या आईहून आपली स्वप्ने वेगळी आहेत याची त्याला कल्पना आलेली आहे.