Home
>
Books
>
ऐतिहासिक, माहितीपर
>
Asa Ghadla Bharat (1947 - 2012) 1947 Pasunchya Ghatana - Ghadamoditun Ulgadalela Swatantra Bharat - असा घडला भारत ( १९४७ - २०१२) १९४७ पासूनच्या घटना - घडामोडींतून उलगडलेला स्वतंत्र भारत
असा घडला भारत ( १९४७ - २०१२)
१९४७ पासूनच्या घटना - घडामोडींतून उलगडलेला स्वतंत्र भारत
1947१९४७ - २०१२१९४७ पासूनच्या घटना - घडामोडींतून उलगडलेला स्वतंत्र भारतAitihasikAsa Ghadala BharatAsa Ghadla Bharat 1947 - 2012Asa Ghadla Bharat 1947 2012Asaa Ghadla BharatBharatEtihasHistoricalHistoryHistory Of IndiaIndiaInformationInformativeMahitiparMilind ChampanerkarPasunchya Ghatana - Ghadamoditun Ulgadalela Swatantra BharatRohan PrakashanSuhaas KulkarniSuhas KulkarniSwatantra Bharatअसा घडला भारतअसा घडला भारत ( १९४७ - २०१२)असा घडला भारत १९४७- २०१२इतिहासऐतिहासिकमाहितीपरमिलिंद चंपानेरकररोहन प्रकाशनसुहास कुलकर्णी
Hard Copy Price:
25% OFF R 1690R 1267
/ $
16.24
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.
स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे.
गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !
असा घडला भारत हे एक अत्यंत सुंदर, माहितीपर आणि संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे. मराठी मध्ये असा संदर्भ ग्रंथ नाही ही कमतरता या पुस्तकामुळे नक्कीच कमी झाली आहे. वर्ष, विषय यानुसार असलेली मांडणी, आवश्यक तेथे ऐतिहासिक संदर्भ आणि तटस्थ माहिती परंतु तरीही सुंदर आणि समजेल अशी ओघवती मांडणी असे थोडक्यात या संदर्भ ग्रंथाचे वर्णन करू शकतो. शालेय विद्यार्थ्यांपासून अगदी कोणीही त्याचा आपल्या गरजेनुसार वापर करून माहिती मिळवू शकतो. धन्यवाद रोहन प्रकाशन.