Summary of the Book
भारतातील वौद्यकीय महाविद्यालयांत वौद्यकीय इतिहास आवर्जून शिकवला जातोच असे नाही .या विषयावर भारतात फार थोड्या प्रमाणात लेखन संशोधन झाले आहे. मराठीतही काही लेखकांनी स्फुट स्वरूपाचे लेखन केले आहे . वौद्यकीय अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या विषयावर डॉ. चंद्रकांत शंकर वागळे यांनी बराच अभ्यास करून 'वौद्यकाची यशोगाथा' आणि 'आत्मा ते जनुक' ही दोन पुस्तके लिहिली .
'हिपोक्रॅटिसची शपथ' या पुस्तकात वौद्यकातील महत्वाचे चर्चाविषय आणि अजरामर संशोधनकार्य करुनही प्रकाशझोतात नसलेल्या भारतीय तसेच परदेशी संशोधकांची ओळख डॉ.वागळे यांनी करून दिली आहे .
वैद्यकीय व्यवसायात आलेल्या डॉक्टरचे वर्तन कसे असावे याबद्दल प्रत्येक वैद्यकप्रणालीतील पूर्वसुरीनी काही नीतीनियम ,बंधने ,काही सूचना आपल्या लेखनातून मांडल्या आहेत .चरक, सुश्रुत या भारतीय आचायांनीआपापल्या संहितांमध्ये तर ग्रीसमधल्या हिपोक्रॅटिस या रोगोपचारकाने वैद्यक व्यावसायिकांनी पाळावयाची आचारसंहिता स्पष्टपणे नोंदवून ठेवली आहे . विशेषतः वैद्यकीय व्यावसायिकांना नितीमत्तेची जाणीव करून देऊन वैद्यकाला उद्दात पातळीवर नेण्याचे कार्य हिपोक्रॅटिसने केले .
हिपोक्रॅटिस आणि इतर संशोधकांनी वैद्यकशास्त्रांसाठी दिलेली नीतिमत्तेची ही आचारसंहिता या पुस्तकातून वाचकांसमोर येते .त्याचबरोबर वैद्यकाच्या इतिहासाचा माहितीपूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न हा छोटेखानी पुस्तकातून डॉ. वागळे यांनी केला आहे .यामुळे वैद्यकशास्त्राकडे बघण्याचा एक सजग दृष्टीकोन वाचकांसमोर येतो .