Summary of the Book
स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होतं. सावरकर म्हणजे चिरंजीवी मंत्र. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने ‘अनादि अनंत सावरकर’ हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. या महापुरुषाची नव्या पिढीला सर्वंकष ओळख करून देण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली. विक्रम सावरकर. डॉ. दाउद दळवी, वा. ना. उत्पात, नामदेव ढसाळ, शंकर गोखले आदी अभ्यासकांचे लेख यात आहेत.