Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
माणसाचा जन्म हे एक मोठे कुतूहल आहे. जन्मानंतरही अनेक गोष्टींबद्दल प्रश्न उभे राहतात. त्याबद्दल आश्चर्य वाटत राहते. लेखक, कलावंत अनिल अवचट यांनाही कित्येक गोष्टींबद्दल मनात प्रश्न निर्माण होतात. त्याचे उत्तर शोधण्याच्या ध्यासातून त्यांना खूप वेगळी, अद्भुत माहिती हाती येते. हीच माहिती त्यांनी 'कुतूहलापोटी'मधून वाचकांना सांगितली आहे.
साधारणपणे विषारी समजली जाणारी बुरशी परोपकारी कशी ठरते, याचे वर्णन करताना बुरशीचा इतिहास, भूगोलासह अत्यंत रंजक माहिती दिली आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, सापडणारा बॅक्टेरियाचा मागोवाही त्यांनी 'बॅक्टेरियाचे इन्फेक्शन' झाल्यासारखा घेतला आहे. कीटकविश्व, सापांची दुनिया, पक्षांच्या राज्यातील गमतीजमती उलगडून दाखविताना मधमाश्यांचे सहकार जीवनाचेही वर्णन केले आहे.
जगातील आश्चर्यांपेक्षा आपल्या शरीरातील एकसे एक आश्चर्य कोणती आहेत, त्यांचे कार्य, रक्षणकर्ते रक्त, पोटाच्या पोकळीत शांतपणे काम करणारी स्वादुपिंड उर्फ पाँक्रिआसची वैशिष्ट्ये सांगताना भयावह कर्करोगाचे गणितही समजावून दिले आहे. शेवटी मनुष्याच्या जन्मरहस्याच्या कुतुहलापोटी त्यांनी निसर्गाच्या या आविष्काराचा शोध घेतला आहे. विश्वातील रहस्यांची ही माहिती वाचून थक्क व्हायला होते.