Summary of the Book
प्रख्यात व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांची वाटचाल सांगणारं आत्मकथन.
आजपर्यंत फडणीस यांच्या चित्रांनी वाचकांना मनसोक्त हसवलं. आता या चित्रांचा आणि चित्रकर्त्यांचा प्रवास या पुस्तकातून कळणार आहे. या आत्मचरित्रामुळे व्यंगचित्रकारांचा संघर्ष आणि त्यांचे कष्ट लोकांसमोर येणारे आहेत. मुळात आपल्याकडे चित्रकार आणि चित्रकलेसंबंधीची पुस्तके कमी आहेत. फडणीस यांचे आत्मकथन नव्या चित्रकारांना प्रेरणा देणारे ठरेल, यात शंका नाही.