Summary of the Book
प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व असते. स्वत:चा विकास साधत त्याने इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असल्याचे दाखवून दिले आहे. म्हणूनच व्यक्तिमत्व विकास हे त्याच्या आयुष्याचे साध्य आहे.
करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्वाचा विकास करणे आवश्यक आहेच; शिवाय आयुष्यातही यशस्वी होण्यासाठी याची गार असते. प्रगल्भ, समृद्ध व सखोल व्यक्तिमत्व विकास कसा साधायचा हे शिवराज गोर्ले यांनी 'कसा कराल व्यक्तिमत्व विकास'? मधून सांगितले आहे.
व्यक्तिमत्वात बदल करण्यापूर्वी प्रथम चांगला माणूस होणे आवश्यक आहे. यश, पैसा, प्रतिष्ठा, सत्ता हे मोठेपणाचे लक्षण असले, तरी माणूसपणाचा विचार हा सर्वात महत्वाचा ठरतो. तेथूनच व्यक्तिमत्वात बदल करण्यास सुरुवात होते. आयुष्यात काय करायचे हे ठरविल्यानंतर व ते साध्य झाल्यानंतर वेगळी वाटही धरायला हवी.
व्यक्तिमत्व घडत कसं?, त्यातील तीन घटक, बदलाचा प्रारंभ, स्वतःला ओळखून त्यातील दोष कमी करणे, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, विधायक दृष्टीकोन, आत्मविश्वास, संवादाने माणसे जोडण्याची कला, योग्य प्रभाव पडण्यासाठी, निर्णयक्षमता आदींबाबत यात विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले आहे.