Summary of the Book
ए. डी. जोशी यांचं हे आत्मचरित्र शिक्षण क्षेत्रातील एका ध्येयवादी माणसाची धडपड सांगतं. घरची गरिबी असूनही त्याचा बाऊ न करता उलट जिद्दीनं शिक्षण घेऊन सोलापूरमध्ये प्राध्यापक होऊन नंतर कोचिंग क्लासेस यशस्वी करणारे जोशी पुढं शाळा आणि महाविद्यालयही काढतात. त्यांचे कष्ट आणि त्यांनी पुढे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घेतलेली मेहनत व शाळेचा निकाल चांगला लागण्यासाठी केलेले प्रयोग हा साराच भाग वाचनीय झाला आहे.
जोशी सरांचा संघर्ष वाचताना कुणालाही प्रेरणा मिळेल आणि यशाचा टप्पा गाठण्यासाठी बळ मिळेल. शाळा चालवत असताना त्यांची काहीही चूक नसताना त्यांच्यावर एक संकट कोसळलं. त्यातून ते बाहेर पडले, तो प्रसंग वाचताना मन व्यथित होतं.