Hard Copy Price:
R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
मुकुंद टाकसाळे यांच्या कथा, लेख, सदरं यांतून भेटणारा विनोदी हा खर्या अर्थानं ‘आजचा’ विनोद आहे, समकालीन विनोद आहे. आजच्या जीवनातील संगती-विसंगती यांचा तो थेट वेध घेतो.
‘मुकुंद टाकसाळे’ यांच्या कथांतला निर्व्याज (इनोसंट) विनोद लुटल्यानंतर मला सतत असे वाटू लागले आहे, की टाकसाळे हे चिं. वि. जोशी यांचे वारसदार होऊ शकतील’ ही भविष्यवाणी त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या वेळी जयवंत दळवी यांनी वर्तवली होती. अगदी अलीकडे टाकसाळे यांची दिवाळी अंकातील कथा आवडल्याच्या निमित्तानं श्री. ना. पेंडसे यांनी त्यांना पत्र पाठवून ‘तुम्ही चिं. वि. जोशी यांचा अवघड वारसा अधिक अवघड करीत आहात’ असा आपला अभिप्राय कळवला होता. हा अवघड वारसा एकीकडे पेलत असतानाच स्वत:ची अशी वेगळी वाट अजमावत टाकसाळे यांच्या विनोदाची वाटचाल दिमाखात चालू आहे.
‘साडेसत्रावा महापुरुष’ या संग्रहात त्यांच्या विनोदी कथांचा, लेखांचा आणि नाटुकल्यांचा समावेश आहे. या संग्रहातील त्यांच्या ‘इंगा’ आणि ‘अपयशाचा धनी’ या दोन कथा विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर घडतात, तर ‘साडेसत्रावा महापुरुष’ ही कथा अगदी आजच्या वर्तमानपत्री आणि इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेच्या जगात घडते. टाकसाळे यांच्या विनोदविषयांची व्याप्ती यावरुन ध्यानात यावी. हा विनोद जसा वाचकाला हसवतो, तसाच तो अंतर्मुखही करतो.